माझ्या डायरीची पाने चाळताना
मला एक नव स्वप्न दिसल
उद्याकरता बरच काही मांडून ठेवण्याच
एक नव साधन दिसल,
काळ जुना सरतच असतो
वेगाने नव्या वेळेकडे
नवा माणूस, नवी संस्कृती
तरी एकमेकांतल आपलेपण
सांभाळाव लागणार आपल्यालाच
जुन्या नव्याच समीकरण,
बिल गेटस आणि डॉ. नारळीकर
यां सोबत माझ्या डायरीत
मला जपायला हवेत आज
लोकमान्य टिळक व आगरकर
नव्या मनाचं, हे नव स्पंदन
'डायरी' नवं सुखाच आंदण.