जीभेवरी माझ्या / उधारीचा शब्द..

क्षणांचा पाचोळा / धुमसतो काळ
विश्वाची आबाळ / कशापायी

आपल्या गळ्याला / आपलाच फास
पायाखाली रास / निखार्यांची

फुटोनिया जातो / जन्माचा कातळ
उठते मोहोळ / पारावर....

आगीतही डोले / तुझे रानफुल
वसंताची भूल / शिशिराला......

जीभेवरी माझ्या / उधारीचा शब्द
कुणाचे प्रारब्ध / कुणापाशी......

----------अनंत ढवळे