तो जगावेगळा, निराळा, नाकारलेला
गर्दित असुनदेखील एकटा
सर्वकाही मिळुनही हरलेला
स्थिरावलेला असुनही भटका
तो जन्मलाच मरता मरता
आता मरतानाही जगन्याची आस
जगण्यालही थकला पूरता
पून्हाही जगण्याचे भास
त्याच्याही आशा साध्या सरळ
हव्या त्या वेळी न भेटलेल्या
नशीबी एकच मरणप्राय कळ
भावना ही कधी पेटलेल्या कधी विझलेल्या
त्याचा जगण्याला सोनेरी किनार
पण सारेच धागे विस्कटलेले
वरून घाव भरलेले पण
आतून मात्र चिघळलेले......
अमोल