अरे संसार संसार

ती :

    

सुखी होतो आपण दोघे

आप आपल्याच जगात

पेटतय आता रण

तूझ्या माझ्या दोघांत

माझी मी सुखी होते

आईची लाडकी होते

बाबांचे प्रेम होते

हट्टासाठी माझ्या ते

वाट्टेल ते करत होते

आठवते ती आपली पहिली भेट

नंतर हि`याच्या अंगठीचा सेट

मारलास मग तू प्रपोज थेट

मग झाली आपली कायमची भेट

कळल हे जेव्हा घरी माझ्या

बंद झाला माझा कॉलेजचा दरवाजा

बहाना केला नि पळाले घरून

पून्हा आले घरी पण ते लग्न करून

घरचा दरवाजा बंद झाला

कसाबसा संसार सुरू झाला

राहन्यासाठी आलो तूझ्या घराला

मधुचंद्र आम्ही ऊटीला केला

नव्याचे नउ दिवस संपले होते आता

पैशाची चण्चण येता जाता

महिनाभरही पूरत नव्हत तूझ पेमेंट

आता कुठली आलेय लिपस्टीक आणि सेंट

लग्नाआधी घेतल्या होत्यास बड्या बड्या शपथा

आता काही आण म्हटल्यास पेटतो तूझा माथा

फसवलस तू मला तूझ्या बेगडी प्रेमात

कळून चिकली आता मला तुम्हा पूरूषांची जात

तो :

बस्स..............

आता पूरे कर

किती देशील ग दोष

आता कुठ भानावर

आलेत माझे होश

भाळलो तूझ्या रूपावरती

झाली माझी चूक

तूझ्या नट्ट्यापट्ट्यापायी

हरवली माझी तहान भूक

राहीन तूझ्यसोबत सुखी

केला होतास वादा

करू पाहतेस मला तू

तूझ्या हाता खालचा प्यादा

हौस तूझी फार

तू बड्या घरची छोकरी

तुझ्या हौसेपायी केली मी

ओव्हरटाईम नोकरी

केल तूझ्यासाठी मी ईतक काही

पण त्याच तूला काहिच वाटत नाही

फार केल तूझ्यासाथी सांग होय की नाही?

पण आता मला काही पूढ जमनार नाही

होण्याआधी आपल्या

आयुष्याचा विस्फोट

आता काही पर्याय नाही

घेऊया आपन घटस्पोट

खरच .........

सुखी होतो आपण दोघे

आप आपल्याच जगात

पेटतय आता रण

तूझ्या माझ्या दोघांत

                           -अमोल