शोध शोध शोधलं कुठे कुठे म्हणू पण नाही सापडलं
तुम्ही सांगाल? तुम्हाला हे समाधान कुठे बरं गवसलं?
जन्मी आलो त्या निरागस बालपणात बेमालुम हरवलो
आईच्या वात्सल्यात नितांत हेलावलो अंगाई श्रवून सुखवलो
समाधान म्हणता ते तिच्या गोधडीच्या उबेत आहे असं का वाटलं?
तिच्या देवाज्ञेने एकदा जे हरवलं ते पुन्हा नाहीच गवसलं
आयुष्याच्या पायर्या चढता मैत्रीची व्याख्या कळली
पण हाय रे दैवा मित्राची संगत क्षणभंगुर ठरली
समाधान म्हणता ते त्या मैत्रीतच आहे असं का वाटलं?
सवंगड्याच्या दुराव्याने जे हरवलं ते पुन्हा नाहीच गवसलं
कर्तुत्वाच्या जोरावर तरी सापडतं का पाहुया म्हटलं
शिक्षण संपवुन परदेशी नोकरीचं जमवलं
स्वतःच घर झाल्यावर तरी मिळेलच असं का वाटलं?
घरच्या घरीच जे हरवलं पुन्हा नाहीच गवसलं
सस्मित सहचारीणी रुपी मग नक्षत्रांतली परी अवतरली
संसारच्या तारा जुळता जुळाता तारुण्ये ओसरली
तिच्या स्वप्नाळू डोळ्यात नक्कीच मिळेल असं का वाटलं?
नित्याच्या कामात तिच्यासम हरवलं ते पुन्हा नाहीच गवसलं
हे मना निश्चय सोडू नकोस सदुक्तमार्गी चालायचयं
भावनेला तिलांजली दे आता आपल्या सोनुलीच्या विश्वात हरवायचयं
बोल बोबडीच्या गोजीऱ्या चेहऱ्यात का बरं नाही शोधावसं वाटलं?
आकाशाला गवसणी का? हे तर तीच्या बोबड्या बोलात वसलयं