प्रेम

मी गेले काही महिने बंगळूर येथे नोकरी करतो. साधारण दहा एक महिने झाले असतील. जेव्हा मला इथे सहा महिने झाले, तेव्ह माझी एक मैत्रिण इथे आली. तीही एका मोठ्या आय टी कंपनित नोकरी करते. तिच्याशी माझी चांगली मैत्री आहे. आण्खी एक मित्र आहे आमचा इथे. तो मला तसा फरसा भेटत नाही. पण दोन आठड्यातून एकदा तरी भेटतोच. ती मात्र मला दर शनिवार-रविवारी भेटते. आधी मला ती एक खूप चांगली मैत्रिण होति. पण गेले कही दिवस झाले मला तिच्याबद्दल  प्रेमाची भावना जाणवू लागली आहे. पण आज मात्र तिने मला अगदी धक्काच दिला. हे सांगून की तिला तो आवडायला लागला आहे!!!!! पूर्वी तर ती कधी त्याचे नावही घेत नसे!!!! आणि आज..... असे का होते???? माझ्यसोबतच का होते????? या प्रश्नाने मला अगदी भांडावून सोडले आहे. म्हणूनच आज मी मनोगतल लिहावयाचे ठरवले. जर काही मार्ग्दर्शन होऊ शकत असेल तर जरूर करावे.