दिवाळी म्हणजे आपणा भारतीयांचा सर्वात आवडता सण ! दसरा दिवाळीचे आमंत्रण देऊन जातो आणि दिवाळीची जय्यत तयारी सुरू होते. घर आवरण,फराळ,खरेदी त्यात विशेष म्हणजे बच्चेकंपनीसाठी फटक्यांची खरेदी.मी शिक्षण आणि नोकरीसाठी घराबाहेर राहते,तेव्हा दिवाळीसाठी घरी जाण्याचा बेत होता.माझ्या मित्र-मैत्रिणीनमध्ये बरेच जण माझ्यासारखेच घराबाहेर राहतात.त्यामुळे दिवाळी सेलेब्रेशन म्हणून आम्ही ७ नोव्हेंबरला रात्रीच्या जेवणासाठी पुण्यातील घोले रोडवर असलेल्या " शबरी " हॉटेलमध्ये गेलो होतो.तेथे मी जो अनुभव घेतला तो मझ्यासाठी नवखाच होता.
शबरीमध्ये प्रवेशद्वाराताच पाणी भरलेली कुंड होती,त्यात विविधरंगी जरबेराची फुले आणि दिवाळीचे प्रतिक असलेल्या पणत्या लावून ठेवल्या होत्या.तसेच जेवणाच्या हॉलमध्येही एक दीपस्तंभासारख ठेवून त्यावरही छान छान पणत्या लावलेल्या होत्या,हळुवारपणे संगीत चालू होत.मनाला भावनार्या या सर्व गोष्टी मी प्रथमच अनुभवत होते.वातावरण एवढ मंत्रमुग्ध होत की मला माझ्या भारतीय सन्स्कृतीचा अभिमान वाटला.मी धन्य मानते की मी सुंदर देशात जन्माला आले आणि अशाच सुंदर अनुभवाची प्रचिती मला आली. अशीच आपली संस्कृती भारताच्या कानाकोपर्यात जपली जावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना ! ! !