दिनांक १०-१२-२००६ रोजी माझी "पुढारी" वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली कविता.
माझा भ्रमाचा फुटताच
भोपळा "एक"
मी टाकलेली असते
उडी "दुसरयात" लगेच
निवारा तर पाहिजे असतो
जीवनाला
काहीतरी सांगितलं जातंच
मनाला
तिथं राहणंच वाटतं मला
सुरक्षित
की सत्य न जाणणारा
आहेच मुळी मी अशिक्षित?
काही असो
काहीही असेल
भोपळे अनेक
आणि मी मात्र एक -रोहन जगताप