हसत आहे भिकारिण

हसत आहे भिकारीण
आणि तिची मुलगी लहान
‘स्वतःला विसरुन काही क्षण’
की ‘आहे त्यात मानून समाधान?’
      रस्त्यावरचं असं चित्र
      मला खरंच वाटलं विचित्र
      कारण शाळेत शिकलो होतो मी
      दुःखी कष्टी आहेत ती
राहतात आपल्यातच इथे तिथे
‘जगवेल जी जागा त्या तिथे’
मळकट कपड्यात, विस्कटलेल्या केसांनी
भटकत असतात, ते अनवाणी
      कुस्करलेल्या फुलाचं
      आयुष्य जणू त्यांचं
      पण तोच सुंदर गंध फुलाचा
      जणू त्याच्या आत्म्याचा
वरुन नसतानाही
अंतरंगात सर्वकाही
तेच मन काही मागणारं
भावनांमागे धावणारं
      म्हणूनच हसत आहे भिकारीण
      आणि तिची मुलगी लहान
      ‘हसल्या त्या दोघी समाधानाने
      की एकमेकांवरील प्रेमाने?’

रोहन जगताप
पुढारी वर्तमानपत्रास पाठवलेल्या कवितांपॆकी एक.
http://marathidesh.blogspot.com/