उदास शांतता
हतबद्ध चेहरे
कुजक्या भिंती
पत्र्यांची घरे
अस्ताव्यस्त कचरा
त्याचा वास
अंधारच अंधार
मिणमिणता प्रकाश
आजारी कोणी,
कोणी कामात
विषण्ण आकॄत्या
दिसताहेत घरात
जीवन हुडकत
भटकणारे कुत्रे
दॆवाच्या हाती
सगळी सुत्रे
मळका वेश
दारिद्र्याची रेष
इच्छा स्तब्ध
त्या तिथे
रोहन जगताप
आणखी कविता वाचा-
http://marathidesh.blogspot.com/