'चुकले'

गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले
निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले
दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले
किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले
घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले
तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले
बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले
इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...