निवांत संध्याकाळी

सूर्य मावळत असतो
देऊन रंग छटांचे आपल्यासाठी
डोळ्यांत साठवण्यासाठी
स्वप्नांत पाहण्यासाठी
जीवन सजवण्यासाठी
        तेंव्हा डोकं आणि परीसर थंड होऊ लागतात
        मनही शांत, निवांत होतं
        सभोवतालच्या वातावरणात रममाण होतं
        की भूतकाळातील एखाद्या रमणीय ठिकाणी जातं!
सूर्य निघून जातो
आपल्याला संधी देऊन विश्रांतीची
नव्या दिवसाची सुरूवात नव्या उत्साहानं करण्याची

-रोहन जगताप
http://marathidesh.blogspot.com/