आठवणी

आजसुद्धा डोळ्यांतून
ढग बरसतात
जेव्हा तुझ्या आठवणी
मनामध्ये दाटतात

आठवणींच्या धुक्यामध्ये
मी हरवून जातो
डोळ्यांसमोर फक्त
तुझा चेहरा दिसतो

जेव्हा आठवणींच्या देशात
मी हरवून जातो
लोक म्हणतात मी
दिवसा तारे मोजतो

अश्रू गाली ओघळतात
तेव्हा जागा होतो
डोळ्यांतल्या अश्रुंबरोबर मी
मनातल्या आठवणीसुद्धा पुसतो

---- हेमु