सीओईपी वसतिगृहा मधील रॅगिंग चा पहिला दिवस

माझे संपूर्ण नाव संदीप विनायक पाटील आहे. माझा जन्म १० डिसेंबर १९८३ रोजी चोपडा या गावी झाला. मी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ नाचणखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे माझे १ ली ते ४ थी चे प्राथमिक शिक्षण घेतले. माझे ५ वी ते १० वी चे माध्यमिक शिक्षण साधना माध्यमिक विद्यालय कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे झाले. मला १० वी च्या परीक्षेत ८३ पॉंईंट २६ गूण मिळाले. ...... चुकला.....!!!!! चुकला......!!!! चुकला.....!!!!! चुकला......!!!! पॉंईंट(POINT) ... हा दुसऱ्या भाषेतला शब्द आहे. भाषा बदलायची नाही.

माझे पाय थरथर करायला लागले. अंग घामाने चिंब भरू लागलं. माझा "ज्येष्ठ विद्यालय / वसतिगृह मित्र" माझ्याकडे बघून जोर जोराने ओरडू लागला. "चला... आता संदीप पाटील परत "ओळख" करून देतील......." चला सुरू करा परत. 

मग मी ती पोपटपंची परत म्हणायला सुरुवात केली. ह्या खेपेला मात्र मी भाषा बदलण्याची चूक केली नाही.......!!!! आणि अशा प्रकारे माझी " स्व ओळख " ह्या रॅगिंग च्या प्रकारामधून माझी सुटका झाली. पण कुठल्या तरी माझ्या ज्येष्ठ विद्यालय /वसतिगृह मित्राला काय आठवण आली कुणास ठाऊक? "ए, चल आता तू एखादी गंमत करून दाखव". माझ्या ज्येष्ठ विद्यालय / वसतिगृह मित्रांनी मला कुठलाही कलाप्रकार करण्यास सांगून माझ्यातला लपलेला कलाकार जागृत केला. आणि मी मग पुटपुटू लागलो.

"वाघाच्या जबड्यात घालुनी हात......मोजिती दात..... ही जात मराठ्याची......." त्या आधी मी, कुस्ती मध्ये पेहेलवान दंडाला थोपटतात, तसे दंड थोपटायला विसरलो नाही. माझ्या ज्येष्ठ विद्यालय / वसतिगृह मित्रांपैकी जे जे "मराठे" होते, ते सगळे जाम खूश झाले माझ्यावर.

मग मी, माझं आवडतं गाणं म्हणायला सुरुवात केली." एक दिन बिक जायेगा, माटी के मोल.. जगमे रह जायेंगे प्यारे तेरे बोल.....ला~ ~ ~ ला ~~~ ललल्ला..." माझे  ज्येष्ठ विद्यालय / वसतिगृह मित्र कनवाळू नजरेने माझ्याकडे बघू लागले. [float=font:vijay;place:top;color:52507F;]माझ्या दर्द भऱ्या आवाजाने त्यांची मनं जिंकली होती. मग मला रॅगिंगच्या भव्य दिव्य प्रकारातून सुटका देण्यात आली.[/float]

त्या नंतर वसतिगृहाच्या आवारात जेव्हा जेव्हा माझे ज्येष्ठ विद्यालय / वसतिगृह मित्र मला भेटले त्या त्या वेळेला....मला त्यांनी, वरील संवाद म्हणावयास लावला. त्या दिवसानंतर प्रत्येक दिवशी, आमच्या ज्येष्ठ विद्यालय / वसतिगृह मित्रांच्या रूम ला आमच्या भेटी झाल्या.

मनोगती मित्रांनो, तर.... असा आहे माझा...रॅगिंग चा अनुभव..!!! माझ्या इतर सहकाऱ्यांना काय काय गोष्टी कराव्या लागल्या त्या मी येथे नमूद केलेल्या नाहीत. शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील तर माफ करणे. मनोगतावरील माझे पहिलेच लिखाण.