पुस्तकपरिचय: "स्वदेश! आम्ही मराठी एन. आर. आय." -संपादन: भूषण केळकर

पुस्तकपरिचय: "स्वदेश! आम्ही मराठी एन. आर. आय." -संपादन: भूषण केळकर

नुकतेच स्वदेश या नावाचे एक सुंदर पुस्तक वाचनात आले.

इतर मनोगतींनाही ते वाचण्यात रस असेल वाटल्यामुळे त्याची इथे तोंडओळख करून देत आहे.

प्रकाशनः ग्रंथाली, प्रकाशनकालः १० जून २००७, मूल्य रु.१६०/- फक्त

परदेशात दीर्घकाळ वास्तव्य केल्यानंतर भारतात कायम निवासासाठी परतलेल्या पंचवीस यशस्वी दंपत्यांची मनोगते संकलित करणारे हे पुस्तक मला आवडले. नव्या संदर्भांना सुसंगत विचारसरणींची मुक्त अभिव्यक्ती त्याने आपल्यापर्यंत पोहोचली आहे.  Nest Returned Indians (NRI)  अशी एन.आर.आय. ची नवी व्याख्या करून संपादकांनी सुरेख सुरवात केलेली आहे. डॉ‍. जयंत नारळीकरांची समर्पक प्रस्तावना आहे. आणि समाधानी, सुस्थित एन.आर.आय. लेखकांची निरनिराळ्या संदर्भातली निरनिराळी मते आहेत. मराठी आकलन आणि अभिव्यक्तीस नवी परिमाणे देणारे हे पुस्तक वाचनीय आहे.

अवश्य वाचा आणि त्यासंबंधी इथे चर्चाही करा!