ओसर..

घाव सलतात थोडे दिवस,
मग जखमा भरुन येतात...
वेदनांची आगही ओसरते...
... मागे उरते फक्त मन...
नि त्या घावांचे रंगबिलोरी
न दुखणारे चमचम वण...

असेच काही दागिने घालून
मिरवत असतो आजकाल...