१. पापलेटचे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावे (तुकडे डोकं ते शेपूट यात समांतर करावेत. २. तुकड्यांना तिखट, हळद आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवावे. ३.
रवा आणि थोडी कणिक एकत्र करून त्यात पापलेटचे तुकडे परतवून (रवा नीट लागला
पहिजे पापलेटला) मंद आचेच्या तव्यावर थोडं तेल टाकून त्यावर ठेवावेत. ४. अंदाजाने अधून मधून परतवावेत (म्हणजे नीट शिजतात). गरज असेल तर तेल घालावं. ५. १०-१५ मिनिटांमधे पापलेट नीत शिजते. वासावरून किंवा सुरी खुपसून शिजल्याचा अंदाज लागतो
१.फ़िश करी (घुमण) आणि साधा भाताबरोबर (मला) जास्त चांगलं लागते.
२. पापलेटला आले-लसुण, चिमुटभर गरम मसाला आणि चिंच किंवा लिंबू लावला (तिखट , हळद आणि मीठा बरोबरीने) तर आस्वाद वाढतो.
ऐकैव, अनूभव, दुसर्यांचे बघून
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.