एकदा आई म्हणाली मला
सोन्यासारखे दिवस दवडू नकोस
(नी)मी जाणतो
सोनेरी सूर्यकिरणांत उजळणारे दिवस
आणि पुढे ती म्हणाली
खूप खूप मोठ्ठा होऽ
मी जाणतो
तिची माझ्यावरील मोठ्ठी माया
मला केवळ जाणायचे आहे,
ह्या जीवनापलीकडे काय आहे?
सोनेरी दिवस आणि आईची माया?...
शाळेत ऎकलं होतं भाषणांत-
‘परी किर्तीरूपी उरावे...’
मी जाणतो
चिरकाल स्मॄतींवरील प्रवास
नंतर ऎकली मी सुचना,
‘मुलांनो शांतता पाळा!’
मी जाणतो
शांतता ह्या जीवनातली...
मला केवळ जाणयचं आहे,
ह्या जीवनापलीकडे काय आहे?
(माझ्या) ‘चिरकाल स्मॄती’ आणि ‘खरी शांतता’?...
-रोहन जगताप
माझ्या सर्व कविता वाचा-
दुवा क्र. १