सांगशील का देवा मला
कसं असत मरण
जीवनातल्या दुःखापेक्षा
भीषण असत का मरण
नको नको म्हणत असतांना
कधी कुशीत घेत मरण
तर कधी मागुनसुद्धा
दुर पळत मरण
कधी दारापाशी नेउन
सोडून देत मरण
तर कधी अचानक
हसता-खेळता नेत मरण
जन्माला येतो त्याच
निश्चित असत मरण
जीवन नसत शाश्वत पण
शाश्वत असत मरण