चिरकाल

जसं जसं आपण मोठे होऊ लागतो, आपल्यासमोरील ध्येये निश्चित होऊ लागतात. हे जीवन काय आहे? अणि ह्या जीवनविश्वात देवानं आपली जागा नेमकी कुठं निश्चित केली आहे? ह्या गोष्टींचा आंदाज घेण्यापासून, इथं टिकून राहण्यासाठी पुढं काय केलं पाहिजे?  इथपर्यंत येऊन माणूस विचार करत राहतो. आपल्या ध्येयांना मग सुंदर स्वप्नांची सोनेरी किनार लाभते. ध्येयपूर्ती होण्याआधीच आपण उंच उंच स्वप्नांमध्ये हरवून जाऊन, ध्येयपूर्तीचा आनंद घेत असतो. आणि तो आनंदच महत्त्वाचा असतो. शेवटी समाधान हीच तर जीवनाची सार्थकता असते. त्या निर्मळ स्वप्नांची हॄदयपटलावर उमटलेली तेवढीच सुंदर चित्रं, म्हणजेच प्रत्येक मानवाची, त्याच्या अंतरीच्या चित्रकाराची अभिजात कलाकृती आहे. आणि हळूहळू ह्या कलाकृतीचं जेंव्हा ध्येयपूर्तीमध्ये रूपांतर होतं, तेंव्हा ती स्वतःपूर्तीच मर्यादीत न राहता, तीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. व इतरांसाठी आनंदाचे आणि समाधानाचे प्रेरणास्थान ठरते. ती क्षणभंगुर जीवनातील पूर्णत्त्वाची कलाकृती, विश्वाच्या भिंतींवर, चिरकालाच्या संग्रहात, प्रत्यक्ष देवाकडूनच जतन करून ठेवली जाते...

-रोहन जगताप
दुवा क्र. १