अगा जे करुणेचे दाह, ते होतसे दुःसह
परतीच्या वाटेवरले, सर्प जणू
त्या प्रपाती अवकाश, देखिला जो इंद्रधनू
मोडती श्वासाचे शब्द, उभ्या देही
कवणमात्र जी माया, मोहिले प्राण जे कृपाळा
तिच्या गतीत तोकडा, भेद राहिला
तिचे पुन्हा पुन्हा आठव, जोडले मागेच जे शव
त्या विजेच्या कारणाते, भास पुन्हा
होई जो संभव सोहळा, अनुमाने अर्थची निमाला
त्यायोगे जो सापडला, तो समीप
जाई जो आकाश मापून, त्या पावला पक्षाचे बळ,
परी मोजती जर पंख दुकानी, तर चालणेही निष्फळ
क्षुद्र जनांस ज्याचा लोभ, ते नेणत्याचे कवित्व
अक्षरमात्रे ओळखू येती, जाणत्याचे यत्न
अंती आत्ममग्न जो बैसला, तो परंपरेचा दास
अंती प्रकट जो बोलला, तो अंतरात उदास