कार्यकर्ता - पत्रकार संजय संगवई यांनी 'आंदोलन' या नियतकालिकामध्ये लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह 'उद्गार'चे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत भा. ल. भोळे यांच्या हस्ते रविवार, २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावरील साने गुरूजी स्मारक येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत प्रा. राम बापट अध्यक्ष तर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर प्रमुख पाहुणे असतील. जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयतर्फे निर्मित हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे.