बराहा ही आज्ञाप्रणाली वापरून ' ज्ञ ' हे अक्षर कसे लिहायचे ? मी कितीही प्रयत्न केले तरी ' द्न्य ' असेच येते. मनोगताच्या टेक्स्ट ऍडिटरमध्ये 'ज्ञ'ची अडचण नसली तरी इतरत्र (ब्लॉगवर, वर्ड वा नोटपॅडमध्ये, इत्यादी ) लिहिताना मला दरवेळेस ही अडचण येते.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.