अळवाची देठी

  • अळवाचे देठ १२ - १४
  • दही दोन वाट्या
  • दाण्याचे कूट
  • तूप, जिरे, हिरवी मिरची, मीठ
३० मिनिटे
तीन जणांना तोंडीलावण्यासाठी

अळवाचे देठ सोलून त्यांचे बोटबोट लांबीचे तुकडे करावेत.

चमचाभर तूप तापवून ते धुरावल्यावर त्यावर हे देठ टाकून ज्योत बारीक करून परतावे. नंतर एका झाकणात पाणी घालून ते झाकण कढईवर ठेवून ते शिजवून घ्यावेत. साधारण दहा-पंधरा मिनिटांत शिजतात. शिजल्यावर ते बारीक रगडून गार करून घ्यावेत.

तुपाची फोडणी करून त्यात जिरे, हिरवी मिरची घालून त्या रगडलेल्या देठांवर घालावी. त्यावर मीठ, दाण्याचे कूट घालून एकजीव करावे. मग दही घालून सारखे करावे.

(१) अळू खाजरा नसल्याची खात्री करणे गरजेचे आहे.

(२) वरून बारीक चिरलेली कोथिंबीरही आवडीप्रमाणे घालायला हरकत नाही.

कोंकणातील पारंपारिक