रमेश भाटकर कास्टिन्ग काउच प्रकरण

     रमेश भाटकर यांची बदनामी करण्यामागे नक्की काय षडयंत्र आहे? या प्रकरणामुळे मरठी कलावंतान्ना आणि मराठी सिनेस्रुष्टीला बदनाम करण्याचा कुणी कट तर रचला नसेल ना असा दाट सन्शय येतो. मुळात जी तक्रार दाखल झालेली आहे, त्यानुसार रमेश भाटकर हे आरोपी नाहीतच. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून बलत्कार केल्याचा आरोप चित्रपट निर्माते रवि नायडू यांच्यावर आहे व इतर ज्या पाच जणान्विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखवून सह आरोपी करण्यात आले आहे त्यात भाटकरांचे नाव आहे. एकाच वेळी बलात्कार व विनयभंग कसा होउ शकतो याचा खुलासा कायदेपंडीतान्नीच करायला हवा. विनयभंगाची नक्की व्याख्या तरी काय? राजकीय बळी द्यायचा असेल तर नेत्यान्वर व राजकीय कार्यकर्त्यान्वर असे आरोप सर्रास केले जातात. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्जय जोशी यांची एक 'अश्लिल' सीडी प्रसिद्ध करून बरीच खळबळ उडवून दिली गेली होती. यामुळे सन्जय जोशी व भारतीय जनता पक्षाची मनसोक्त बदनामी झाली व आता पोलीसान्नी सांगितले कि ती सीडी बनावट आहे व त्यात सन्जय जोशी नाहीत. मग जोशींची जी बदनामी झाली ती कोणी भरून द्यायचि? जम्मूमधील एक सुंदरी अनारा गुप्ताची अशीच एक 'सीडी' बाजारात आली व ती बदनाम झाली. आता तज्ज्ञान्नी जाहीर केले की सीडीत दिसणारी ती मुलगी म्हणजे अनारा गुप्ता नव्हेच. मग तिची अशी बदनामी का व्हावी? वासनाकांड करणारे नेते सुटतात व विनयाने वागणारया रमेश भाटकरान्वर विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो व 'बलात्कार बलात्कार' म्हणून बदनामी होते. रमेश भाटकर हा माणुस तसा नाही हा विश्वास त्याच्या सहकलाकारान्ना व रसिकान्ना वाटतो यातच त्याचे निर्दोषत्व सिद्ध होत आहे. अब्रू हि झाकण्यासाठी व जपण्यासाठी असते. फिल्मी पार्ट्यांत नग्नतेचे प्रदर्शन करणारया मुलीन्ना व या मुलींचा बाजार मांडणारया त्यांच्या आयान्ना हे कोण समजावणार? की भाटकर हे कारस्थानाचे बळी आहेत.

     हे कारस्थान कलावंत भाटकरान्विरुद्ध आहे की न्यायमुर्ती असलेल्या त्यांच्या पत्नी म्रुदुला भाटकरान्विरुद्ध आहे याचाही छडा लागला पाहीजे. न्या. म्रुदुला भाटकरान्समोर मुंबईतील रेल्वे बॉंबस्फोटांचा खटला सुरू होता व आरोपी असलेल्या धर्मांध अतिरेक्यान्ना न्या. भाटकरान्नी फैलावर घेतले तेव्हा आरोपीन्नी भाटकरान्विरुद्ध तक्रार केली व आमच्या महान राज्यकर्त्यान्नी न्या. भाटकरांची बदली केली.

(काही भाग वगळला. - प्रशासक)