गूगल तृप्त

जी भारतभूमी सर्वाधिक संगण्क प्रणाली पुरवते तीचे संगणक सुपूत्र भारतीय भाषांशी नव्या प्रणाली वापरता याव्यात या बद्दल सजग नसतात तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्थांकडून भारतीय भाषांशी सख्य जोडले जावे ही अपेक्षा थोडी दूरापास्त होते.पण गूगल हे संकेतस्थळ याला अपवाद दिसते. सर्व भारतीय भाषातून शोध घेण्याची सुविधा देण्यात गूगलने विलंब लावला नव्हताच,सोबतच देवनागरीत आंतरजालावर टंकनसुविधा गूगलने दिली .आणि आत्ता गूगलची हिंदी आवृत्ती पाहिली त्यात इंग्रजीत(रोमन) लिपीत टाईप करताच मराठी आणि हिंदी पर्याय तत्काळ उपलब्ध झाले म्हणून तृप्त हा शब्द रोमन लिपीत टाईप करून पाहिला तर लगेच गूगल शोधयंत्राने तो मराठीत दाखवला आणि शब्दाची निवड करताच माझे मराठी मन तृप्त झाले.

गूगल शोधयंत्र त्या सोबत काम करणारी मंडळी यांचे मना पासून कौतूक करावेसे वाटते.

-विकिकर