तू...

माझा  प्रत्येक  निवांत  क्षण तसा  
तुझ्याच  आठवणींनी  सजलेला
मनाचा  प्रत्येक कोपरा  तसा, तुझ्या
आठवणींच्या बिंदुत  भिजलेला

अस  कधीच  झालं  नाही तसं  आधी
मी  मलाच हरवून  बसलो आहे  आता
कळेना  मला अशी  काय जादू   केली तू
प्रत्येक चेहरा  तसा  तुझाच  वाटतो आता

चाहूल कुणाची   जेव्हा कधी  लागते मला
तू  आल्याचा  भास होतो  मला  तसा  आता
पाना  फुलांत, नदी  ओढ्यात, सागराच्या
फेसाल लाटेतही  दिसतेस्  मला  तू आता

कधी होवो  होवो  भेट यापुढे  आपली
तुझा   चिवचिवाट  कानात गुंजेल  माझ्या
अवचित  मंद झुळुक  येता वार्‍याची
तुझं  निखळ हासू  कानात  घुमेल माझ्या