राहून गेलं.....``

प्रेमात पडतांना, तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं,
तोंड दुखेपर्यंत बडबडतांना, हवं ते सांगायचं राहून गेलं.

ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता-करता हवं ते घडायचं राहून गेलं.

नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं.

तिच्या ओढणीचा, खांद्याचा स्पर्श हवा-हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहून गेलं.

प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य होई,

त्या दिवशीही ती निघाली अन..... तिला अडवायचं राहून गेलं