कॉर्न पुडिंग

  • लोणी-३ टे. स्पून
  • मैदा-३ टे. स्पून
  • क्रीम कॉर्न (टिन्ड)-पाऊण टिन
  • मक्याचे दाणे (फ़्रोज़न)-२ वाट्या
  • साखर-३ टे. स्पून
  • दूध-३ कप
  • मीठ-चवीनुसार
  • टोबेस्को-४-५ थेंब
  • ब्रेड-३ स्लाइस
  • चीज (किसलेला)-५ टे‌पून
४५ मिनिटे
४-५

१. सर्वप्रथम ब्रेड आणि २ टे. स्पून चीज मिक्सर मधून काढून घ्यावे.
२. गॅस वर कढई मध्ये लोणी घालावे.
३. ते थोडे गरम झाले की मैदा घालावा. २ मिनटं मैदा परतावा.
४. क्रीम कॉर्न घालावे आणि दूध घालावे. दूध घालताना मिश्रण हालवत राहावे.
५. मिश्रण थोडे दाट झाले की साखर, मीठ आणि टोबेस्को घालावे.
६. उरलेला चीज घालावा. एक उकळी येऊ द्यावी.
७. फ्रोझन मक्याचे दाणे घालावे आणि २ मिनिटंनी गॅस बंद करावा.
८. आता हे मिश्रण एका बेकिंग ट्रे मध्ये काढून घ्यावे आणि वरून आधी वाटून ठेवलेले ब्रेड आणि चीज घालावे.
९. १८० तापमान वर २० मिनिटं अवन मध्ये बेक करावे.
१०. गरमच खाण्यास द्यावे.

-हा एक मेक्सिकन डेझर्ट चा प्रकार आहे.
- टोबेस्को कुठल्याही ग्रोसरी स्टोर मध्ये मिळतं.(सॉस च्या सेक्शन मधे)
- साहित्य जरी नेहमीचं नसलं तरी पदार्थ चवीला मस्त होतो, एकदा तरी करुनच बघा. :)

मैत्रीण