पौष्टिक टोमॅटो ऑमलेट

  • ३ मोठे टोमॅटो
  • ३-४ लसुन पाकळ्या
  • बेसन १ वाटी
  • रवा ४ चमचे
  • सोयाबीन पिठ १/२ वाटी
  • तेल, मीठ, हळद, तिखट
१५ मिनिटे
२ लोकाना पुरेसे होइल

   सर्वप्रथम टोमॅटोचे मोठे काप करावे

 ते फ़ुड प्रोसेसर मध्ये घालून त्यात लसून घालून एकजिव करावे.

त्यातच मीठ , हळद , तिखट , अंदाजे बेसन आणि सोयाबीन पिठ घालावे.

टोमॅटो ऑम्लेट ला कुरकुरीत पणा येण्यासाठी ४ चमचे रवा घालावा.

हे सर्व परत एकदा एकजिव करून फुड प्रोसेसर मधून काढावे.

डोश्याच्या पिठासारखे पातळ करावे.खुप दाट वाटले तर त्यात जरा पाणी घालावे.

गॅस वर तवा ठेवून तो खुप तापवावा , म्हणजे त्याला ऑम्लेट चिकटणार नाही.

आता त्या तव्यावर तेल सोडून त्यावर १/२ वाटी हे पिठ घेउन गोल एकसारखे पसरावे.

खालून तयार झाले की उलटावे.खरपुस भाजावे.

आणि सॉस अथवा दही बरोबर सर्व्ह करावे.

धन्यवाद.

     

  *     हे पिठ फुड प्रोसेसर मध्ये फार चटकन तयार होते,त्यामुळे गडबडी च्यावेळी बनवू शकतो.

   *    तव्यावर पसरताना ते पातळ आणि एकसारखे होइल याची काळजी घ्यावी.

   *  सोयाबीन मध्ये खुप प्रोटिन्स असतात, पण काही लोकाना ते चविला आवडत नाही.म्हणून सोयाबीन चे दाणे भाजून घेउन ते दळून ठेवावे.

        हे  सोयबीन पिठ थालिपिठ मध्ये ही घालता येते . 

  * आणखी पौष्टिक करण्यासाठी यात बेसन कमी वापरून ज्वारी आणि बाजरी चे पिठ वापरू शकता.

........हा माझा मनोगत ला लिहिलेला पहिलाच पदार्थ आहे.

आपले अभिप्राय जरुर कळवा.

धन्यवाद......

माझी आई.