साजना येशील तू जेव्हा....

साजना येशील तू जेव्हा....

येशील माझ्या स्वप्नी जेव्हा

चांद शीतल होऊनी ये...
चांदण्याचा स्पर्श चंदेरी
ओंजळीत तुझ्या घेवूनी ये...

येशील माझ्या अंतरी जेव्हा,
सुरेल तारा ह्रिदयाच्या,
थंडगार गारा पावसाच्या,
अंगावारी तुझ्या घेवूनी ये...
येशील माझ्या श्वासात जेव्हा,
गंध कोमल सुमनांचा,
रंग गहरा पाकळ्यांचा,
मखमली ओठांवरी सजवून ये...
येशील माझ्या आत्म्यात जेव्हा,
एकरूपं ध्यास आयुष्याचा,
बंध अतूट नात्यांचा,
विश्वास एकमुखी वचनांचा आठवत ये...
मग आलास तू इथे असा की,
मी सर्वस्वी तुझीच होऊन जाईन,
तुझी वाट पाहणारे हे पाणावलेले डोळे,
तुझ्यावर पाझरून तुला कायमची बिलगून जाईन...
-- आ.. आदित्य...