पाऊस

आभाळाची झारी लागली झराया
झोपलेली बीजे लागली उठाया
सारीपाटावरी सोंगट्यांची खेळी
माणसे राबता तरारली खळी
हात हालवून बोलावती सारे
वृक्ष म्हणती कसे या रे या रे या रे
नदीचा प्रवाह काठांना बुडवी
डोंगरांची तोंडे झाली का रडवी
सगळ्या बाजूंनी कोसळले रडे
खळाळत येती हिमशुभ्र ओढे
इवलाले गोटे चिमुकली रोपे
सृष्टीने निर्मीली छोटीशीच मापे
आसमंत गुंजे धारांच्या नादाने
दाद देई सृष्टी डोले आनंदाने
------गरीब बापुडा निवडुंग रुसे
किती हा पाऊस------तगणार कसे???