स्टार प्लस वरील रामानंद सागर यांची "साईबाबा" : अत्युत्कृष्ट मालिका!

स्टार प्लस वरील रामानंद सागर यांची "साईबाबा" ही मालिला अतिशय छान आहे. ती मालिका तुम्ही बघत नसाल तर काहीतरी तुम्ही गमावले आहे असेच म्हणावे लागेल. साईबाबा च्या भूमिकेसाठी निवडलेला कलाकार ही त्यांची एक अत्युत्कृष्ट निवड म्हणता येईल. त्याची संवाद फेकण्याची पद्धत, लोकांना चांगल्या गोष्टी सांगण्याची पद्धत इतकी प्रभावी आहे की सांगता सोय नाही आणि ती तुम्हाला विचार करायला जरूर प्रवृत्त करेल. ह्या मालिकेसाठी सगळ्या चमूने खूपच मेहेनत घेतलेली दिसते. इतर सगळ्या देवादिकांच्या मालिकांपेक्षा ही जास्त प्रभावी वाटते. इतर धार्मिक मालिका मनाची ईतकी पकड घेत नाहीत, त्या कृत्रिम वाटतात. मनाचा इतका ठाव घेऊ शकत नाहीत. पण या मालिकेत  रोजच्या जीवनातील प्रसंग दाखवून समाज प्रबोधन करण्याचा एक स्तुत्य आणि सफल प्रयत्न केला गेला आहे. कुणावर अन्याय होत असेल तेव्हा साईबाबांना ते आपोआप कळते आणि ते त्यावेळेस खुप अस्वस्थ होतात. त्यावेळेचा अभिनय तर अत्युत्तम या प्रकारात मोडतो. साईबाबा मलिकेचे शिर्षक गीत ही छान.

साईबाबा हे स्वामी समर्थांचे अवतार मानले जातात. या मालीकेमध्ये अधून मधून स्वामी समर्थ सुद्धा येतात. त्यांच्या कथा व कलाकाराची निवड ही अत्युत्कृष्ट.

यु.के. (इंग्लंड) मध्ये स्टार प्लस वर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता ही मालिका असते. भारतात नक्की केव्हा असते माहीती नाही पण रविवारीच असणार हे नक्की! सगळ्यांनी अगदी जरूर बघावी असे मला वाटते. शाळा कॉलेजांमध्ये दर आठवड्याला ही मालिका दाखवायला हवी. कुणी त्या शिकवणीप्रमाणे लगेच वागू शकणार नाही(कलीयुग आहे ना!) हे जरी खरे असले तरी तुमच्या मेंदूला चांगल्या दिशेने जाण्याची प्रेरणा नक्की या मालिकेने मिळणार. सॉस-बहू च्या निरर्थक मालिका बघून डोक्याला वात आणण्यापेक्षा साईबाबा बघणे अनेक पटीने चांगले!

या चर्चेचा उद्देश : जे ही मालिका नियमितपणे बघतात त्यांनी या चर्चेच्या माध्यमातून त्याबद्दल विचार मांडावेत. जे बघत नाहीत किंवा ज्यांना त्याबद्दल माहिती नव्हती त्यांनी ही मलिका बघावी आणि आपली मते जरूर मांडावीत. माझ्या पत्नी ने सांगितल्यावर मी ही बघायला सुरूवात केली आणि त्यात असा गुंतत गेलो की रविवारी साईबाबा बघितल्या शिवाय चुकल्या चुकल्यासारखे वाटते.....