मल्टीयोगा १

आम्ही नवीन फ्लॅटमध्ये रहायला जाणार होतो. राहता फ्लॅट भाड्यानी न देता आपल्याला तिथे काय करता येईल ह्याचा विचार करू लागले. माझ्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यांचा उपयोग दुसऱ्यांकरिता कसा करता येईल? विचारांती असं वाटलं की हेल्थ क;अब सुरू करता येईल. आजकाल गल्लीबोळात जीम आहेत. आपण वेगळ काय देऊ शकू? आजच्या स्त्रीला काय हवं आहे? मला स्वतःला काय हवं आहे?  हेल्थ क्लब सुरू करायचा म्हणजे मी स्वतः सुडौल असायला हवी. महिन्याभरात मी माझं वजन ८ किलोनी घटवलं. हं मी आता लोकांना सांगू शकते. मी पोहायला जाते तिथे अनेक बायकांशी गप्पा होतात, त्यातून असं जाणवलं की मुलांचे संगणक धूळ खात पडलेले आहेत. बाहेर जाऊन शिकायला संकोच वाटतो, ही सेवा आपण देऊ शकतो.एक गृहिणी तृप्त असते जर तिचं कुटुंब व्यवस्थित जेवलेलं असेल. एका घराला एकत्र बांधून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असते ती तिच्या स्वयंपाकघराची. वेगवेगळ्या पाककृती करून पाहणे, इतरांना सांगणे (कुकरी शो) ते परीक्षक बनून जाणे ह्या  प्रवासामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढला होता. ह्या सगळ्या माझ्या आवडी (वाचन, संगणक साक्षरता, पाककला व योगाभ्यास) एकत्रित मल्टीयोगद्वारे दुसऱ्यापार्यंत पोचवता येतील. हे जरी वेगवेगळे क्षेत्र असले तरी उद्द्येश  एकच आहे टु लिव बेटर लाईफ.

आपली भारतीय संस्कृती संम्पन्न आहे तीचं जतन इथे करता येईल, प्र्त्येक सण साजरा करून. महिन्यातून एकदा एखाद्या तज्ञ व्यक्तींशी, डॉक्टरांशी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधण्यात येईल. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे पण गरज आहे ती एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेण्याची व सहयोगाची भले ही ती मोलकरीण असो वा लोणचं पापड करणारी. स्त्री शक्ती एक सृजन शक्ती आहे स्वतःत परिपुर्ण. मल्टीयोगाद्वारे या परिपर्णतेला मूर्तरुप देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद!

हा छोटासा प्रयत्न आहे लक्ष्मीनगर, नागपूर इथे.

सध्या आठजणी वीस  ते पंच्चावन्न वयोगटातल्या. दोन पाककलेचे वर्ग झाले, एक गुजराथी व केक विशेष. केकच्या पाककृती अगोदर टाकलेल्याच आहेत गुजराथी लवकरच टाकीन. एका खास गुजराथी पूर्णवेळ गृहिणीने (अनिता) तीन पाककृती उत्कृष्टरित्या शिकवल्या. अनिताच जेव्हां पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तेव्हां ती खूपच भारावून गेली. माझ्या जीवनात इतका चांगला प्रसंग कधी येईल असं स्वप्नात  देखील वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया तिनी व्यक्त केली.