आज पुन्हा एकदा,
ओळखीचा आवाज येतोय..
पिलांच्या त्या किलबिलाचा
अर्थ मी समजतोय...
आज पुन्हा एक पिलू
घरट्या बाहेर उडू पाहतय...
आपल्या पंखातील जोरावर
अवघं आभाळ जिंकू पाहतय......
आई पिलाची त्याला
उडून जायला सांगतेय.....
मन मात्र तिचं त्याला
थांबवण्याचा आक्रोश करतयं....
असाच एक प्रयत्न
मी देखील केला होता
आईच्या मनातील आक्रोश
तेव्हा जाणला नव्हता...
आज पुन्हा एकदा
ओळखीचा आवाज येतोय
आईच्या त्या वेड्या मायेचा
आज अर्थ मी जाणतोय.........
-नचि.