बकुळ फुला रे ...

बकुळ फुला रे बकुळ फुला
गंध तुझा दे गंध मला
मधुगंध तो लेउनी
धुंद होऊ दे धुंद मला ।

न दिसे मज वाट
चहूकडे अंधः कार
साथ तुझी सदा
लाभू दे मला ।

कळले नाही कधी
सरले सुख कसे
तुज सवे दुः ख माझे
विसरू दे मला ।

खिन्न उदासी मनी
एकाकी दिनराती
तव कोमल स्पर्शाने
हर्ष लाभू दे मला ।

न उरले जे या
जीवनी मजपाशी
तुजसवे ते सारे
घेऊ दे मला ।

न सोबती मज कोणी
न साद कोणी देई
तुझ्यासवे जीवनाचे
गीत गाउ दे मला ।

शुष्क या जगती
जरी निष्पर्ण जीवनवेल
तुजपरी वाळल्यावरी
गंधीत होऊ दे मला ।

बकुळ फुला रे बकुळ फुला
गंध तुझा दे गंध मला ।