लक्ष मोत्यांची पखरण....तुझी एक आठवण
शुभ्र फुलान्ची ओंजळ....विट्ठल चरणी अर्पण
रक्तचंदनाचे लेप....विरांगना गोंदण
ओसंडून वाहणारे दवबिंदू....पापण्यातली साठवण
दुलईत गुर्फटून बसलेली....भोकाडीची आठवण
जमदग्नीची चाहुल....भांड्यांची आपटण
आईच्या पदराचं हातपुसणं.... आनन्दाची शिंपडण
अन तिला भंडावुन सोडणारी.... असंख्य प्रश्नांची गोफण
पण ती सोडून गेल्यावर.... निराशेचं कोंदण
जीवनात प्रतिदिनी.... ह्या अश्याच नवरंगांची उधळण