अस्वस्थ

इथेच ह्या ठिकाणी मी बोलला होता नवस

मनाशी पक्के करून उपास केला एक दिवस

डोळ्यात होती सप्न गगनाला भिडण्याची

भीती नव्हती मनात कुठेही पडण्याची

पडलो जरी कुठे तरी तू वाचवशील मला

भोळीभाबडी समजूत एव्हड्याश्या जीवाला

आता साऱ्या आयुष्याची उंची कळत आहे

पाहिलेल्या सप्नांची जेव्हा किंमत मोजावी लागत आहे

सुखाची वाट पाहून आता डोले थकलेत

श्रद्धा, सबुरी हे शब्दही आता विटलेत

आता जरी हातपाय तोडून बसलो आहे

पंख आपले कधीचे छाटून बसलो आहे

थकून भागून तुझ्या दारी पुन्हा आलो आहे

नवस पूर्ण होण्यासाठी नवस करायला आलो आहे

प्रयत्नांव्यतिरिक्त आता हेच माझ्या हाती आहे

"बळ दे हाती" आता हेच पुन्हा ओठी आहे!