सालाबाद प्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यातही आम्ही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे निसर्ग शिबिराचे आयोजन केले आहे. जनमानसात निसर्गाबद्दल जागरुकात निर्माण करणे हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सदर शिबिरामध्ये जंगल सफ़ारी, मचाणावरून वन्यजीव निरीक्षण, स्लाइड शो, तज्ज्ञाची व्याख्याने यांद्वारे निसर्ग ओळख करून दिली जाणार आहे.
सदर शिबिराचा कालावधी दि. ६ मे ते 1२ मे आहे. शिबीर शुल्क रु. ५८००/- असून त्यात पुणे-ताडोबा-पुणे असा सर्व खर्च अंतर्भूत आहे. शिबीरा करिता फक्त १५ जागा असून त्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार भरल्या जातील.
इच्छुकांनी नाव नोंदणी व अधिक माहिती करिता खालील व्यक्तींशी संपर्क साधावा ---->
देवदत्त नाईक,
१८०२, इ वॉर्ड, श्री
अपार्टमेंट, राजारामपुरी,
कोल्हापूर - ४१६००८.
भ्रमणध्वनी - ९४२३०४१५५१.