एक नवीन ऑल-इन-वन सॉफ्टवेअर

आजकाल ऑल-इन-वन वस्तू जास्त
वापरात येतात. सगळ्या गोष्टी त्यात एकत्रितपणे मिळण्याची सोय असल्याने ते
सुटसुटीत पडते. अशीच एक सुटसुटीत प्रणाली माझ्या पहाण्यात आली.

हॉटमेल , याहू आणि जीमेल अशी तिन्ही खाती असणारे,
त्याद्वारे विरोप पाठवणारे, वाचणारे, गप्पा मारणारे काही कमी नाहीत. पण
त्याकरता आपण किती प्रणाल्या संगणकावर उतरवून घेतो ? याहू आणि हॉटमेल च्या
गप्पांकरता ’याहू मेसेंजर’ आणि जीमेल करता ’जीटॉक’. विरोप महाजालावरच वाचत
असलात तर ठीक नाहीतर आऊटलूक किंवा थंडरबर्ड किंवा तत्सम. महाजालावरच वाचत
असलात तर किती संकेतस्थळांना भेटी द्याव्या लागतील ? अर्थातच तीन हॉटमेल ,
याहू आणि जीमेल. पण एवढे सगळे  उपद्व्याप करणा्री एखादी प्रणाली जर मिळाली
तर किती बरं होईल ना ?

तर मंडळी, अशी एक प्रणाली मला मिळाली आहे. सध्या ती
बाल्यावस्थेत म्हणजे बेटा व्हर्जन मध्ये आहे. पण जर तुम्हाला वापरायची
असेल तर उतरवून घेऊन ती वापरू शकता. त्याद्वारे तुम्ही तुमच्या याहू,
हॉटमेल आणि जीमेल अश्या तीनही (इतरही काही) खात्यांचे विरोप एकत्र तपासू
शकता, नको असलेले तिथेल्या तिथेच उडवून लावू शकता, हवे असलेले वाचू शकता
आणि ते ही तुमच्या संगणकाच्या ’सिस्टीम ट्रे’ मधून. तुमच्या तीनही
खात्यांतल्या संपर्कांशी गप्पागोष्टी करू शकता. अश्या काही आणि अजून इतरही
काही सोयी यात आहेत.

मला ज्या संकेस्थळावरून
याबद्दल माहीती मिळाली त्यांच्याकडे ही प्रणाली वापरून पहायला ५०००
आमत्रंण उपलब्ध आहेत. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही प्रणाली उतरवून
घेऊन माझ्या संगणकात टाकली आहे. ती गेले दोन दिवस वापरतेही आहे. मला याचा
चांगला अनुभव आला आहे. सध्या एक त्रुटी म्हणजे मराठी/ देवनागरी सपोर्ट
यांत नाहीये. पण मी तसे नमूद केल्यावर त्यांनी मला आवश्यक त्या सोयी
उपलब्ध होतील म्हणून आश्वासन दिले. शिवाय या सोयी उपलब्ध झाल्यावर या
प्रणालीत असलेल्या ’ऑटो अपडेट’च्या सोयीमुळे त्यात आपोआप बदल केले जातील
असेही सांगितले. तुम्हीही ही प्रणाली अवश्य वापरून पहा. संबधित संकेतस्थळावर ५००० आमंत्रणांची सोय आहेच. त्यात लिहिल्याप्रमाणे  कृती करा. जर काही अडचण आली तर मला वर कळवा. माझ्याकडेही त्यांची १००० आमंत्रणांची सोय आहे.