राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा अशा वैदर्भीय समाजसुधारकांच्या तेजस्वी परंपरेतील समाजसेवक बाबा आमटे यांच्या निधनाच्या वृत्ताने आजची सारीच वृत्तपत्रे व्यापली आहेत. बातमी वाचताना लहानपणी मराठीच्या पुस्तकात वाचलेला त्यांचा धडा आठवला. वसंत कानेटकरांचे 'वादळ माणसाळतंय" हे त्यांच्या जीवनावरील नाटक आठवत राहिले. इ-सकाळ मध्ये आलेल्या हेरंब कुलकर्णींच्या (मी आता तृप्त आहे) आठवणी वाचताना नकळत डोळे ओलावले. एक खूप मोठा माणूस गेला.
अवधूत.