प्राचीन भारतीय खगोलशास्त्र ३

युगांची वर्षे खालील प्रमाणे :

कृतयुग :  ४०० + ४००० +४००

त्रेतायुग : ३०० +३००० +३००

द्वापारयुग : २०० +२००० +२००

कलियुग : १०० +१००० +१००

प्रत्येक युगाच्या सुरवातीस व शेवटी संधिकाळाची वर्षे आहेत.

यापैकी कलियुगची वर्षे  इ.पू.१९०० च्या सुमारास ३६० ने गुणून ४,३२,००० केली असल्यामुळे कलियुग इ.पू.३१०१ मधे सुरू होउनही अजून संपले नाही.कलियुगात सर्व मानव आहेत (देव नाहीत)असे समजून हा बदल करण्यात आला.

रामायण इ.पू.५८०२ ते इ.पू. ५५०२ या त्रेतायुगाच्या शेवटच्या ३०० वर्षात झाले.या काळास

वाल्मिकीनी 'सन्युग' असे अनेक वेळा म्हटले आहे.

महाभारत इ.पू.३१०१ ते इ.पू. ३००१ या १०० वर्षात झाले. या काळास व्यासानी द्वापार

व कलियुगाचा संधिकाळ म्हटले आहे.(यावेळी कलियुगाची वर्षे वाढवली नव्ह्ती.)