हिरव्या टोमॅटोची चटणी

  • हिरवे (कच्चे) टोमॅटो २, गूळ बारीक चिरलेला २ टीस्पून, लाल तिखट १ चमचा, जिरे, मीठ
  • तेल १ टिस्पून, मूठभर कोथिंबीर
१५ मिनिटे
३ जण

प्रथम हिरवे टोमॅटो धुवून त्यांच्या मोठ्या फोडी कराव्यात. कढईत चमचाभर तेलावर त्या परतून घ्याव्यात.

नंतर मिक्सरवर सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.

ही चटणी जराशी पातळसर होते. कुठल्याही पदार्थाला 'डिप' म्हणून चविष्ट लागते.

तिखट बेताने घालावे. दुसरा काही बेस नसल्याने (खोबरे वगैरे) एकदम तिखट होऊ शकते.

आवडत असल्यास अर्धा कांदा घालू शकतो.

माझी नणंद