अजून तिथे

अजून तिथे,
........................

अजून तिथे,
त्या आकाशी,
दिसे माळ पक्षांची!!

अजून तिथे,
त्या अवकाशी,
साठे वाफ शब्दांची!!

अजून तिथे,
घन:श्यामाची,
बरसे सर एखादी!!

अजून तिथे,
ढगाआडूनी,
सोनकिरणे डोकावती!!

अजून तिथे,
थेंबा मधुनी,
सप्त रंग अवतरती!!

अजून तिथे,
इंद्रधनूची,
वाटधूसर आभासी!!

अजून तिथे,
जल रंगांची,
चित्रे विखरत रहाती!!

अजून तिथे,
त्या आंगणी,
रंग- पंचमी अनोखी!!

अजून तिथे,
क्षितीजा जवळी,
छटा जादूई गवसती!!

.....................................

स्वाती फडणीस .....................२००७