मराठी गझल डॉट कॉम आयोजित 'गझल दरबार'

तुझ्या डोळ्यांमधे गहिर्‍या असा मी हिंडतो आहे
जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे...
- चंद्रशेखर सानेकर

मराठी गझल डॉट कॉम सादर करीत आहे

गझल दरबार

सुप्रसिध्द कवी व गझलकार श्री चंद्रशेखर सानेकर यांच्याशी मुक्त संवाद, गझल सादरीकरण व मराठी गझल गायनाचा कार्यक्रम

मुलाखतकार - वैभव जोशी
गझल गायक - अमोल निसळ
निवेदक - मिलिंद कुलकर्णी

(गझल गायनाच्या कार्यक्रमात श्री सानेकर, वैभव जोशी व प्रसाद शिरगांवकर यांच्या निवडक गझला सादर केल्या जातील)

दिनांक २४ फेब्रुवारी,
सायं ६ ते ८

स्थळ :  उद्यान प्रसाद कार्यालय, एस पी कॉलेज जवळ, सदाशिव पेठ पुणे ३०

प्रवेश विनामूल्य! सर्वांना सस्नेह आमंत्रण!