खेळी.
पळत होते मी........
नियती चकवत होती.
तेजाळ कवडसे!!
कधीच हाती न येणारे.
मग ठरवलं,
बस्स!.
आता नाही पळायचे,
पुरे झाला ऊन-सावल्यांचा खेळ,
आणि थांबले.
एका जागी निश्चल.
जिंकल्या सारखी.
:
:
:
खूप उशिरा कळलं,
ती ही तिचीच खेळी.
पुन्हा बरोबर पडलेली.
स्वाती फडणीस......................१९-०१-२००८