हेच ते

हेच ते

मन सौख्याच्या मागे
दु:ख सुखाच्या

आनंद-खेद
सुख-दु:ख
दु:ख-सुख
खेद-आनंद
एका मागोमाग
आवर्तन.........
नसंपणारी

घुसळून निघणारे क्षण
कडू-गोड
सोपे-कठीण
आनंद-दु:ख
एकजीव

काहीसं वेगळंच
दु:खातलं सुख
सुखातलं दु:ख
:
:
तुरट-खारट ... अहं
तिखट-आंबट... च्च
स्स.. छ्या अहंSS

हेच ते..........
जीवन

पूर्णपणे न कळणारं

स्वाती फडणीस...............१६-०२-२००८