सोल बांगडे

  • बांगड्याचे ६ तुकडे (मध्यम आकाराचे)
  • लसूण पाकळ्या ६ ते ७
  • धणे पावडर पाऊण चहाचा चमचा
  • हळद चिमूटभर
  • लाल मिरची पावडर १ चहाचा चमचा
  • कोकमचे तुकडे ३ ते ४
  • तेल १ चमचा
  • पाणी अर्धा कप
  • मीठ चवीनुसार
३० मिनिटे
३ जणांसाठी

लसून ठेचून घ्या. कढईत तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण १ मिनिट भाजून घ्या. नंतर धणे पावडर, मिरची पावडर, हळद घाला. १ मिनिटानंतर बांगड्याचे तुकडे घालून परता.आता १/२ कप पाणी घाला. कोकमचे तुकडे घालून मासे शिजवून घ्या. (बांगडे पारदर्शक रंग सोडून पांढरट दिसायला लागले की शिजले आहेत असे समजावे. ) डिशमध्ये काढून कोथंबिरीने सजवा,
गरमागरम सोल बांगडे तय्यार!

कोकमचे तुकडे नसतील तर चिंच चालते, मात्र पदार्थाचे नाव "चिंच बांगडे" सांगावे :)

स्वप्रयोग!