पाण्याचा एक थेंब आज ढगांतून खाली उतरला...
.
सूर्यकिरणावर पडला... सोन्यासारखा चकाकला
.
इंद्रधनूवर बसला.... सप्तरंगात मनसोक्त रंगला
.
पाना-फ़ुलांनवर विसावला... मोत्यासारखा दिसला
.
पण चुकून एकदा विस्तवावर पडला..अन अस्तित्वच हरवला
.
पाण्याचाच थेंब तो..वाईट संगतीचा परिणाम विसरला.
---
मंदार हिंगणे,
१६/१/२००८