डहुळलेली

डहुळलेली

सख्या सागरा
मी तुझ्याजवळ येते.
तुझ्या सहवासात निवांत बसते.
तुझा निळा पसारा पाहतं,
लाट अन लाट उलगडत,
अफाट अथांग होते.

तू
रोरावतोस!
करडा करडा होतोस.

मी
दूर
किनार्‍या पलीकडे
अस्वस्थ डहुळलेली.

स्वाती फडणीस................................३१-०१-२००८